सगळ्याच लिहित्या हातांच्या डोक्यावर सरस्वतीने हात ठेवला असतो. म्हणूनच कोणतेही लेखन हे कधीच सामान्य नसते, हे लोकव्रत प्रकाशन जाणते. त्यामुळेच आम्ही कोणतीही कविता, कोणताही लेख सामान्य समजत नाही. कारण आम्हाला जाणवत असते, ती लिहिणाऱ्याने व्यक्त होण्यासाठी केलेली धडपड! प्रत्येक लेखात, प्रत्येक कवितेत काही ना काही तरी चांगला विचार दडलेला असतोच. तो विचार, ती भावना वाचकावर चांगला संस्कार करत असते. हीच तर सरस्वतीची पूजा! म्हणूनच, सरस्वतीच्या त्या उपासकांची सेवा करण्याचा संकल्प लोकव्रत प्रकाशनाने केला आहे.
Our Trending Books...
तुमचे स्वागत आहे

लोकव्रत प्रकाशन ही एक साहित्य चळवळ आहे! लिहित्या हातांची चळवळ आहे. महाराष्ट्रातल्या प्रतिभावंतांची चळवळ आहे. सोबतीने लिहू या हे आमचे ब्रीदवाक्य आहे. म्हणूनच, लिहिणाऱ्या प्रत्येकाला हवे असलेले मार्गदर्शन, हवी असलेली मदत आम्ही करत असतो. तीही विनामूल्य! लेखक/लेखिका आणि कवी/कवयित्रींचा आदर व अभिमान बाळगत लेख व स्तंभलेखन ते अगदी संपादकीय, याचबरोबर कथासंग्रह, कादंबरीलेखनाचे प्रशिक्षण देत लेखकांना लिहीते केले जाते. आज लिहीणारे शेकडो लेखक/लेखिका आणि कवी/कवयित्री हे या चळवळीचा आधारस्तंभ झाले आहेत.
ही साहित्यिक चळवळ आम्ही वीस वर्षाहून अधिक काळ चालवतो आहोत. या कालावधीत आम्ही चारशेहून अधिक पुस्तकांची निर्मिती केली आहे. आम्ही 'कविता तुझी माझी' हे पहिले ऑडिओ बुकसुद्धा लोकार्पण केले आहे आणि आतापर्यंत ८१ ई-बुकस् झालीत आणि तीन ई-बुकस् लवकरच प्रकाशित करत आहोत. याआधी अनेक इंग्रजी पुस्तकांची, नाटकांची भाषांतरे आम्ही प्रसिध्द केलीत. याशिवाय साहित्यिकांच्या, चित्रकला- नाट्य- चित्रपट षेत्रातील कलाकारांच्या, पत्रकार- बातमीदार यांच्या मुलाखती या लेखक व पत्रकारांच्यासाठी अभ्यासविषय म्हणून तयार करीत आहोत. तसेच कविता-वृत्तबद्ध, कविता-गझल यांचे अभ्यासवर्ग याच व्यासपीठावरून घेतले जातात.
आम्ही लोकव्रत प्रकाशन, लोकव्रत लेखक संघ, सजल या पेजवर कार्यरत आहोत. आमचे युट्यूब चॅनेलही आहे. आमचे जवळजवळ ५५,००० फालोअर्स आहेत.
आमच्या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला मा. सिंधुताई सपकाळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मा. अजित पवार, सुप्रिया ताई सुळे, जॅकी श्रॉफ, निशिगंधा ताई वाड, मा. पृथ्वीराज चव्हाण, गंगाधर महांबरे, द. मा. मिरासदार... खरे म्हणजे अशी किती जणांची नाव घ्यावी, असा प्रश्नच आहे, पण हे सगळे मान्यवर आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून वेळोवेळी लाभले हे प्रकाशनाचे सौभाग्यच आहे.
हे भाग्य टिकून रहावे यासाठी आम्ही व आमचे लेखक प्रयत्नशील असतो. आणि भविष्यातही राहूच. आम्ही उत्तम दर्जाच्या पुस्तकांच्या निर्मितीची हमी देऊ इच्छितो.
सुजाण लेखकांचा आणि रसिक वाचकांचा दुवा म्हणून काम करण्यातच लोकव्रत प्रकाशनाचा गौरव आहे.